ज्ञानदेवांच्या दृष्टान्ताप्रमाणे, मुलगा वडिलांच्या ताटात जेवायला बसतो आणि त्यांच्या ताटातलं त्यांनाच जेवू घालतो. माझं तुमच्यासमोर बोलणं तशा प्रकारचं आहे...

समाजमाध्यमावर मुक्त स्वातंत्र्य आहे, पण त्यात संभाव्य धोकाही लपलेला असतो. समाजमाध्यमावर वाट्टेल तशी, वाट्टेल तेव्हा कविता झळकवता येते. मनात आले तर नव्या छपाई तंत्रज्ञानातून आकर्षक पुस्तक छापता येते. वर्तमानपत्रे कौतुक छापायला तयार असतात. गल्लोगल्ली पुरस्कारही तयार असतात. हा मोहक प्रवास मनाला भुरळ पाडणारा आहे. अष्टौप्रहर खुडखुड वाजणार्‍या व्हॉट्सअपमुळे आपलं अवधान खंडित झालंय का? आपण सलग विचार करू शकतो का?.......